Posts

कळवातीनीचा महाल, उमाचीवाडी, उस्मानाबाद.

Image
उन्हाळा सुरु झाला कि कधी परीक्षा संपत आहेत आणि कधी गावी जात आहोत याची ओढ लागत असे, याची कल्पना नव्या पिढी समर कॅम्प ला जाणाऱ्या नवीन पिढी ला कधी समजणार नाही. त्यात वडिलांचे गाव म्हणजे वडिलांसारखे बाहेरून कडक आतून मायाळू, आणि मामाचा गाव म्हंटले कि आईसारखे हट्ट, लाड पुरविणारे. "उमाचीवाडी", उस्मानाबाद, " उमाचीवाडी ", उस्मानाबाद बीड आणि अहमदनगर अशा तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीपासून काहिसे जवळ असणारे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील गाव. माझ्या आईचे गाव. उमादेवीच्या चमत्काराने नाव पडलेलं डोंगरांच्या कुशीत दडून बसलेलं हे गाव. अगदी जवळ गेल्याशिवाय गावाची कल्पना येत नाही. आजूबाजूला ईट आणि पाथरूड हि दोन नावाजलेली गावे. शिदोबाची वाडी (वडा ची वाडी ), ज्योतिबाची बाडी/देवाची वाडी, बा गलवाडी अशा काही खेडेगावांची संगत. लहान असताना रानात गेलो कि एक वस्तू मनात घर करून बसायची, गुरे चरताना मुद्दाम गुरांना त्या बाजूला न्यायचं म्हणजे तिथे जात येईल असे प्रयत्न असायचे. आज त्या वास्तू बद्दल सुद्धा मी काही लिहीत आहे यावर माझा हि विश्वास नाही. कळवातीनीचा महाल कळवातीनीचा म